साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कामाला लागावे -.आमदार संजय सावकारे ; गावाला स्मार्ट व्हिलेज अभिनंदन पत्र प्रदान;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातून स्मार्ट व्हिलेज पुरस्काराची मानकरी ठरलेली साकेगाव ग्रामपंचायत उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करून मोठ्या लोकवस्तीची ग्रामपंचायत तसेच विविध जाती-धर्माचे नागरिक गावात असताना गावाला आदर्शवत स्मार्ट व्हिलेजचा दर्जा प्राप्त करणे खरोखर गौरवास्पद असून ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी जय्यत तयारी करावी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन आमदार सावकारे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात स्मार्ट विलेज अभिनंदन पत्र सरपंच ग्रामपंचायत कमिटीला प्रदान करताना केले
नुकताच महाराष्ट्र शासनाचा भुसावळ तालुक्यातून स्मार्ट व्हिलेज पुरस्कार साकेगाव ग्रामपंचायतीने प्राप्त केलेला असून त्यासंदर्भात स्मार्ट व्हिलेज अभिनंदन पत्र आमदार संजय सावकारे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाची ग्रामपंचायत कार्यालय भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोगत असलेले त्यांच्या स्वाक्षरीचे स्मार्ट विलेज अभिनंदन पत्र त्यांनी सरपंच अनिल पाटील यांच्याकडे प्रदान केले प्रसंगी माजी आदर्श सरपंच आनंद ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे समाजसेवक राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती पत्रात त्यांनी नमूद केलेले आहे की,
गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच आनंद ठाकरे यांनी आदर्श गाव संकल्पना व्यक्त केली होती त्या माध्यमातून गावात विविध योजना व फंड वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला आहे दोन वर्षांपूर्वी साकेगाव ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय नामांकन झालेले असताना केवळ मंगल कार्यालय नसल्याने काही गुणांनी राज्यस्तरीय पायाभूत सुविधा पुरस्कार हुकला असे कळल्यानंतर तात्काळ मंगल कार्यालयासाठी वीस लक्ष रुपयांची तरतूद करून दिली गावातील प्रमुख रस्ता तसेच साडेबारा कोटींची एम जी इ पी-2 पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली लवकरच ही योजना कार्यान्वित होईल कुठल्याही गावाची ग्रामपंचायत कमिटी उत्कृष्टरित्या काम करत असेल तर त्या ठिकाणी विविध फंड उपलब्ध करून देण्यासाठी लोक प्रतीनिधी तत्पर असतात अशाच पद्धतीने साकेगाव ग्रामपंचायत विविध पायाभूत सुविधा निर्माण करीत असून ग्रामस्थांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे मला विश्वास आहे ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कार व राज्यस्तरीय नामांकन प्राप्त करेल व उत्तर महाराष्ट्रात भविष्यात महाराष्ट्र शासन साकेगाव ग्रामपंचायत अभ्यास दौऱ्यासाठी निश्चित करेल अशा पद्धतीचा विकास व्यवस्थापन ग्रामपंचायतीने उपलब्ध करावे त्यासाठी परिपूर्ण सहकार्य करण्याचे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित सरपंच कमिटीला आश्वासन दिले त्याबद्दल त्यांचे साकेगाव ग्रामपंचायत सरपंच कमेटी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *