भुसावळ (प्रतिनिधी )-
रावेर यावल परिसरात निसर्ग वादळामुळे केळीचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यावादळाचा फटका तालुक्यातील अनेक ठिकाणी बसला आहे. नुकसानग्रस्त भागाची व झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी जनसेवक अनिल चौधरीं यांनी केली तसेच तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी व्यथा शेतकऱ्यांनी अनिल छबिलदास चौधरी यांच्याकडे करून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
पाऊस आणि जोरदार वाऱ्याने शेती केळीचे नुकसान झाले आहे. निसर्ग वादळामुळे रावेर यावल परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रावेर च्या पूर्व भागात थेरोळा, पुनखेडा, पातोंडी, गावात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्या सर्व समस्या आत्मियतेने जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीशी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा, धीर देण्याचा प्रयत्न केला.तातडीने आपण शासनाकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जनसेवक अनिल छबिलदास चौधरी यांनी सांगितले यावेळी गणेश बोरसे, काशिनाथ बळीराम पाटील, शुभम पाटील, संतोष सावळकर, अमोल पाटील, राजू पाटील व शेतकरी बांधव नुकसानग्रस्त पाहणी वेळी होते .



