श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज मंदिर पादुका पूजन साधेपणाने संपन्न ; चल पादुकांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रस्थान

भुसावळ (प्रतिनिधी )-
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने यावर्षी पायी आषाढी वारीस बंदी घातली आहे. या अनुषंगाने यंदा श्री क्षेत्र सुदुंबरे येथे संत संताजी महाराज समाधी मंदिर येथे शासनाच्या नियम व अटींचे पालन करून संत संताजी महाराज यांच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमी शुक्रवार दि.१२ जून २०२० रोजी अत्यंत साधेपणाने आणि पालखी सोहळा मंडळ यांनी ठरवून व नेमून दिलेल्या मानकरी व सेवेकरी यांचे उपस्थितीत शासनाच्या नियम व अटींचे पालन करून झाले.
या निमित्ताने शुक्रवार रोजी सकाळी, संत संताजी महाराजांचे समाधीस महापूजा मंदिरातील सेवक चंद्रकांत जाधव व सौ.विद्या जाधव यां उभयतांचे हस्ते अभिषेक , महापूजा व आरती करून झाले. तदनंतर नैवेद्य अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी ह.भ.प.अरुण काळे ( अध्यक्ष, पालखी सोहळा मंडळ) ह.भ.प.अनिल राऊत, ह.भ.प. बाळासाहेब काळे ( विश्वस्त पालखी सोहळा मंडळ) आणि शैलेश मखामले ( विश्वस्त सुदुंबरे संस्थान), जयंत राऊत (उत्सव अध्यक्ष २०२०-२१) , प्रदीप उर्फ बाबासाहेब काशीद पाटील ( सरपंच इंदोरी), सचिन आऊसरे ( तेली समाज अध्यक्ष, इंदोरी ), विनोद शिंदे , संतोष काळे आणि महेश भागवत उपस्थित होते.
दरम्यान दुपारी संत संताजी महाराज यांचे पादुकांचे पूजन होऊन आणि मंदिर प्रदक्षिणा होऊन प्रस्थान संपन्न झाले. प्रस्थान प्रसंगी ह.भ.प. नामदेव महाराज तेली , ह.भ.प. विश्वास डोंगरे ( विश्वस्त), ह.भ.प. मनोहर जाधव ( विश्वस्त) , ह.भ.प. बाळासाहेब काळे ( विश्वस्त) उपस्थित होते. त्यानंतर, संत संताजी महाराज यांच्या पादुका श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेटीसाठी नेण्यात आल्या. त्यानंतर , संत संताजी महाराज यांच्या पादुका ह.भ.प. बाळासाहेब काळे (विश्वस्त) यांचे निवासस्थानी विराजमान झाल्या. त्याठिकाणी, संत संताजी महाराज यांचे पादुकांचा मुक्काम दि.३० जून २०२० पर्यंत राहील असे विश्वस्थानी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *