भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील पापानगर,काझीप्लाॅट भागात आता कोरोना रूग्ण नसल्यामुळे प्रशासनाने लावलेले बॅरीकेट्स काढावे अशी मागणी मा.नगरसेवक शेख पापा शेख कालू यांनी प्रांत रामसिंग सुलाणे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,शहरातील काही प्रभागात कोरोना रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासनातर्फे कंटोनमेन्ट झोन तयार करून बॅरीकेट्स लावण्यात आले आहे.काझी प्लाॅट भागात 8 एप्रिल रोजी मरियमबी सुपडू अली ही 75 वर्षीय वृध्द महिला कोरोना पाॅझीटीव्ह आढळली होती.उपचारादरम्यान वृध्देचा मृत्यू झाला असून तिच्या घरातील 5 सदस्य सुध्दा पाॅझीटीव्ह होते मात्र क्वरंटाईन नंतर रूग्णालयात त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे.पापानगर ते काझी प्लाॅट पुल हा प्रमुख रस्ता हा घटनेपासून बंद करण्यात आला होता.मुख्य बाजारपेठेत जाणारा हा रस्ता असून फेकरी,खडका,किन्ही आदी भागातील शेतकरी सुध्दा याच रस्त्याने ये-जा करतात.बॅरीकेट्स मुळे त्यांची रहदारी पुर्णपणे बंद झाली आहे.काझी प्लाॅट,पापानगर व गौसिया नगर या भागात आता एकही कोरोना रुग्ण नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता बॅरीकेट्स काढून रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा अशी मागणी शेख पापा यांनी केली आहे.



