भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरालगत असलेले साकेगाव पूर्णपणे कोरोना मुक्त असून गावात ग्रामपंचायतीचा अर्सनिक अल्बम थर्टी वाटपाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे ग्रामस्थांनी नियमानुसार गोळ्यांचे सेवन करून स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी गोळ्या फक्त तीन किंवा चार दिवस सकाळी उपाशी पोटी सांगितलेल्या प्रमाणात घ्याव्यात कच्चा कांदा अथवा लसुन खाऊ नये असे आवाहन आ. सावकारे यांनी गोळ्या वाटप कार्यक्रम प्रसंगी केले व यामुळे निश्चित ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती वाढ होऊन ग्रामस्थ कोरोना मुक्त राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 11 वाजता आमदार सावकारे साहेब यांच्या हस्ते अर्सनिक अल्बम थर्टी गोळ्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रसंग त्यांनी बोलताना जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आकडा हजारोच्या पार झालेला असून शहर व ग्रामीण परिसर कोरोना च्या विळख्यात अडकत आहेत मात्र साकेगाव याला पूर्णपणे अपवाद असून सरपंच ग्रामपंचायत कमिटी कोरोना नियोजन कमिटी सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्य अधिकारी तसेच गावातील युवावर्ग आदी सर्वांनी अतोनात परिश्रम घेऊन गावात पूरक जनजागृती तथा सर्व ग्रामस्थांनी आपली काळजी घेतल्याने सर्व गाव आज कोरोना मुक्त आहे अशा भावना त्यांनी प्रसंगी व्यक्त केल्या प्रसंगी सरपंच अनिल पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संजय पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील संतोष भोळे डीगंबर पाटील अनिल सोनवाल ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे तलाठी श्री महाजन साहेब डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर कैलास ठाकरे पोलीस पाटील राजेंद्र सपकाळे समाजसेवक राजेंद्र पाटील रवींद्र त्रंबक पाटील भूषण पवार सचिन पाटील सर्व अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना योद्धा असलेले नवयुवक आदींची प्रमुख उपस्थिती होती



