भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात गौसिया नगर भागात लकी किराणा जवळ राहत्या घरात तलवार व चाकु सारखे घातक शस्र बागळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
अधिक माहिती अशी की,फिर्यादी पो.कॉ.कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आरोपी हा त्याच्या राहत्या घरात तलवार व चाकु सारखे घातक शस्र बागळत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने .पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके जळगाव,.उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड ,बाजारपेठचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अनिल मोरे ,पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन,रमन सुरळकर पो.कॉ.कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी,बंटी कापडणे , महिला पोलीस वैशाली सोनवणे, यांनी लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जमील ऊर्फ (राजा) तस्लीम शेख , वय २३, भुसावळ असे सांगितले.तसेच त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली असता घरामध्ये लोखंडी पलंगावरील गादीच्या खाली दोन तलवारी व दोन चाकु असा एकुण ९००- रुपये किमतीचे शस्त्र मिळुन आल्याने पो.कॉ. कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीवरुन दिनांक १० जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग ६, गु.र.न ६३३ /२०२० आर्म अँक्ट ४/२५ व मु.पो.अँक्ट1991 चे कलम ३७ (१) ३ चे उलघंन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.ना किशोर महाजन करीत आहे.



