भुसावळ (प्रतिनिधी)-
उंबराच्या झाडाच्या नको असलेल्या फांदया व्यतिरिक्त दुसऱ्या फांदया तोड़ू नका असे म्हटल्याचा राग आल्याच्या कारणावरुन शहरातील मुक्तानंद कॉलनी आनंद नगर भागात दिनांक ९ जून २०२० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात घुसून मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादि सागर नामदेव रोझतकर, वय- २८ वर्षे राहणार- प्लॉट नंबर- २४४५, मुक्तानंद कॉलनी भुसावळ यांनी फिर्याद दिली की त्यांचे घरासमोर सार्वजनिक जागी असलेल्या उंबराच्या झाडाच्या फांदया तोडायचे काम सुरु होते त्यामुळे त्यांनी फांदया तोडणाऱ्या इसमास ज्या फांदया नडत नसतील त्या फांदया विनाकारण तोडु नको गल्लीतील सर्व लोक त्या झाडाखाली गाडया लावतात मग झांडे का तोडायला लावतात असे म्हटले असता आरोपी विलास निंबाळकर, जयदीप विलास निंबाळकर, निखील संतोष झांबरे,प्रसाद पाटील , ललीत उर्फ लल्ला पाटील,मुकेश कुमावत (राजस्थानी) यांनी सागर नामदेव रोझतकर यास सार्वजनिक ठिकाणी चारचौघात जातिवाचक अर्वाच्च भाषेत जातीवाचक बोलून फिर्यादीच्या पाणउतारा करून, गैरकायद्याची मंडळी जमवून ,दंगा करून संगनमत करून अनधिकृतपणे फिर्यादीच्या घरात प्रवेश केला व फिर्यादी व त्याची आईला घरात घुसून चापटा बुक्यांनी मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणामुळे फिर्यादी व त्यांची आई गोदावरी रुग्णालयात उपचार घेत आहे.म्हणून दिनांक ९ जून २०२० रोजी रात्री ८ वाजेला बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-5 गु.रु.न.२२/२०२० भा.द.वि.कलम ४५२,२९४, १४३, १४७,१४९,३२३,५०६ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा १९८९ चे कलम -३ (१) (दहा),३(१) (अकरा) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड करीत आहे.



