भुसावळ (प्रतिनिधी )-
विशेष गाड्यांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोकांच्या वाहतुकी संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, भारतीय रेल्वे १ मे २०२० रोजीपासून “श्रमिक विशेष” गाड्या चालवित आहे. आजपर्यंत सुमारे “६०० “श्रमिक स्पेशल” गाड्या मध्य रेल्वेकडून देशभरातील विविध राज्यात चालविल्या गेल्या आहेत.
राज्य सरकारच्या विनंतीनुसार श्रमिक विशेष रेल्वेगाडी मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील विविध स्थानकांमधून सुरू करण्यात आली. रेल्वेगाडी (रॅक) तयार करणे, स्वच्छता करणे, त्या रॅक्सची देखभाल करणे, कर्मचार्यांची आवश्यकता पूर्ण करणे, अन्नाची तरतूद करणे, राज्य सरकारांशी समन्वय करणे, सुरक्षित, वेळेवर ट्रेन संचालन आणि एकंदरीत मिशन “बॅक होम” ही कोविड-१९ या कठीण परिस्थितीत एक मोठे आव्हान होते.
रेल्वेमनला अपघातांमध्ये आणि ब्रेक डाउनच्या वेळी,योग्य आणि खराब हवामानात रेल्वे सुरक्षित चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. पण कोविड -१९ च्या आदेशानुसार वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलची देखभाल करून श्रमिक विशेष चालवणे रेल्वेसाठी एक मोठे आव्हान होते, जे रेल्वेने मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या पूर्ण केले.
अशा प्रकारचे कोणतेही पूर्व उदाहरण किंवा मागील अनुभव नसलेल्या भारतीय रेल्वेने अविस्मरणीय कार्य करण्याकरिता पावले उचलली. सर्वात स्वस्त, सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा मार्ग म्हणून कर्तव्यासाठी रेल्वेला जाणीवपूर्वक हाक होती.
एकूणच आतापर्यंत मध्य रेल्वेने सुमारे ६०० श्रमिक विशेष चालवल्या आहेत आणि ८.५ लाखांहून अधिक स्थलांतरितांनी त्यांच्या गंतव्यस्थानासाठी प्रवास केला आहे. या श्रमिक विशेष अनेक राज्यांसाठी चालविले गेले: आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलगाना, त्रिपुरा, उत्तराखंड , उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी परत पाठविण्याच्या मिशन “बॅक होम” ऑपरेशन किंवा ट्रेन ऑपरेशनमध्ये मध्य रेल्वेकडून जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये प्रथमतःच थेट रेल्वे सेवांचा समावेश आहे.
चालविण्यात आलेल्या एकूण गाड्या पैकी ६६% गाड्या मुंबई विभागामार्फत, जवळपास २३% पुणे विभाग आणि सुमारे ११% सोलापूर, भुसावळ व नागपूर विभागांतर्फे चालविण्यात आल्या. जास्तीत जास्त गाड्या मुंबई विभागामार्फत चालविल्या जात असताना, इतर चार विभागांनी मागणीत वाढ झालेल्या दिवसात त्यांच्या डेपोत ८- ९ रॅक राखून ठेवले
श्रमिक स्पेशलचे नियोजन, देखभाल, चालविणे :
सुव्यवस्थित ट्रेनच्या वेळापत्रकात “पडद्यामागील काम करणारे भाग” होते. संपूर्ण समन्वयासाठी ऑपरेशन कर्मचारी, कोचची देखभाल करणारे मेकॅनिकल कर्मचारी, लोकमोटिव्हची देखभाल करण्यासाठी, गाड्या चालवणे, स्थानकांवर आणि कोचमध्ये इलेक्ट्रिक देखरेखीसाठी इलेक्ट्रिकल कर्मचारी, रांग लावण्यासाठी आरपीएफ, प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंगसाठी सुरक्षा म्हणजे आरपीएफ, राज्य सरकारच्या अधिका-यांशी संपर्क साधण्यासाठी, जागावाटप, भोजन व्यवस्था व आयआरसीटीसी समन्वयासाठी वाणिज्य कर्मचारी, ट्रॅक, सिग्नल, ओएचई मालमत्ता सांभाळण्यासाठी अभियांत्रिकी एस अंड टी आणि ओएचई कर्मचारी, आपत्कालीन घटनांमध्ये उपस्थित राहण्यासाठी / वैद्यकीय सेवा देणारे वैद्यकीय कर्मचारी / डॉक्टर इत्यादी सुस्पष्ट कामांद्वारे समन्वयित केल्या.
पडद्यामागील युद्ध कक्ष :
देखरेख, ट्रेनचे नियोजन यासाठी कंट्रोल ऑफिस २४×७ कार्यरत आहे; राज्य सरकारच्या मागणीनुसार श्रमिक विशेष गाड्या नियमितपणे आणि वेळेवर चालविण्यासाठी समन्वयित प्रयत्नांसाठी अधिका-यांची स्थानकांवर, नियंत्रण कार्यालयात आणि दूरध्वनीवर चोविस तास प्रत्यक्ष उपलब्धता.
मुंबईत विखुरलेले कर्मचारी, काही कन्टेनमेंट झोनमध्ये, रेल्वे ऑपरेशनसाठी जबाबदारी सुरूवातीस मर्यादित कर्मचारी आणि अधिका-यांच्या खांद्यावर आली, ज्यांनी आपले काम कधीच सोडले नाही आणि सर्व ठीक चालले आहे याची खात्री करण्यासाठी बहुतेक दिवस पहाटेपर्यंत अथक परिश्रम घेतले.
लॉकडाऊन दरम्यान, या प्रसंगी मध्य रेल्वेचे कर्मचारी कार्य करण्यासाठी दाखल झाले. बरेच कर्मचारी म्हणजेच कोरोना योद्धा पहाटे सकाळी चालत लवकर निघून वा इतर मार्गाने कार्यालयात पोहोचले आणि श्रमिक विशेष चालवणे शक्य झाले.
लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे येथे बहुतांश कामकाज
स्टेशन डायरेक्टर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) आणि पुणे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख आवश्यक आहे, कारण त्यांनी श्रमिकांची मोठी संख्याच हाताळली नाही, तर स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी मदत करण्याच्या प्रयत्नात आघाडीवर असलेले सरकार आणि स्वयंसेवी संस्था आणि राज्यातील विविध विभागांशी समन्वय साधण्याची गरज होती. परप्रांतीयांपैकी शेवटची व्यक्ती निघून जाईपर्यंत स्टेशनचे आवार त्यांना सोडता आले नाही आणि त्यानंतर रेकच्या देखभालीसाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल कर्मचार्यांशी समन्वय साधून दुसर्या दिवसासाठी प्रत्येक तपशिलाची आखणी करावी लागली, त्यासोबत स्थलांतरितांची भौतिक संख्या, वाणिज्यिक कर्मचारी आणि परिसराच्या आवश्यक स्वच्छतेसाठी स्टेशन हाऊस कीपिंग स्टाफसह समन्वय ठेवला. त्यांनी ब्रेक न घेता, झोपेच्या आणि विश्रांती सर्व गोष्टींची तडजोड करून त्यांच्या टीमबरोबर अथक परिश्रम घेतले.



