भुसावळ (प्रतिनिधी )-
साकेगाव येथे कोरोना योद्धांची बैठक गावात आर्सेनिक अल्बम थर्टी मोफत वाटपाचा निर्णय तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना उत्कृष्ट कर्मचारी पाच हजार रुपयांचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे .
जळगाव तसेच भुसावळ शहराला लागून वसलेले साकेगाव ग्रामपंचायत परिसर पूर्णपणे कोरोनमुक्त असून यापुढे देखील सदैव पूर्णपणे गाव कोरोना मुक्त राहावं यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना नियंत्रण समितीची संयुक्त बैठक पार पडली असून त्यात गाव पूर्णपणे कोरोना मुक्त रहावे यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिल पाटील होते यावेळी माजी सरपंच आनंद ठाकरे ,तलाठी महाजन , ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे, पोलीस पाटील, राजू सपकाळे, सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले डॉ. दीपक पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी सौ पाटील मॅडम सर्व आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मदतनीस आदींची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान सर्व नियमांचे पालन करून साकेगाव पूर्णपणे कोरोना मुक्त राहील यासंदर्भात विविध सूचना व मार्गदर्शन सर्व कोरणा युद्धांना याठिकाणी करण्यात आले डॉ दीपक पाटील यांनी अर्सनिक अल्बम थर्टी बद्दल माहिती देऊन जवळपास २ हजार बॉटल ग्रामपंचायत प्रशासनास अल्पदरात उपलब्ध करुन दिले आहे . भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते गावात अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप होणार आहे . तसेच भुसावळ तालुका आरोग्य विभागीय अधिकारी सौ पाटील मॅडम यांनी देखील विविध सूचना करून गाव पूर्णपणे कोरणा मुक्त कशा पद्धतीने राहील यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचना केल्या तसेच सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असताना देखील जीवाची परवा न करता आरोग्य केंद्राच्या सर्व आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका मदतनीस आदींनी गावात जनजागृतीचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडले तसेच निरंतर जनसेवेत कार्यरत आहेत त्यामुळे त्यांचा कार्याचा गौरव म्हणून जी आशा वर्कर उत्कृष्ट कार्य करेल अशा आशा वर्करला येत्या २६ जानेवारी रोजी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पाच हजार रुपये पुरस्कार व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल तसेच ज्या अंगणवाडीतील विद्यार्थी हुशार व गुणसंपन्न तसेच अंगणवाडी सेविकेची शिकवण्याची पद्धत अंगणवाडी व्यवस्थापन आदींचे गुणांकन करून अशा उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेला पाच हजार रुपयाचे पुरस्कार व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल असे निश्चित करण्यात आले साकेगाव ग्रामपंचायत नुकतेच स्मार्ट व्हिलेज म्हणून तालुकास्तरावर सन्मानित झालेले असून नुकताच ग्रामपंचायतीला दहा लक्ष पुरस्कार प्राप्त झालेला आहे .तरी आता ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कंबर कसली असून ग्रामपंचायत व्यवस्थापनामध्ये ज्या काही कमी असतील त्रुटी असतील त्या सर्व बाबी स्वयंपूर्ण करून साकेगाव ग्रामपंचायत जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज म्हणून सन्मानित होईल व २५ लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त करेल अशा पद्धतीचे नियोजन व आयोजन ग्रामपंचायत प्रशासन करीत असून त्यासाठी गावातील सर्व शासकीय निमशासकीय व्यवस्थापन उत्कृष्ट तसेच सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृतिशील असल्याचे सरपंच अनिल पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे व ग्राम विकास अधिकारी श्री वाडे यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे व सर्वांनी आदर्शवत कार्य करण्याच्या सूचना देखील केल्या.



