भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता फैलाव व बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी व्यावसायीकांना दुकाने उघडून द्यावयाचे दिवस ठरवून दिले आहेत शिवाय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यानंतरही ठरवून दिलेल्या दिवशी दुकान न उघडता नियम मोडल्याने शहरातील चार दुकानांना सील ठोकण्याची तसेच बाजारात गर्दि करणाऱ्यां फळ व भाजीच्या ८ हातगाड्या व विक्रेत्यावर कारवाई प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत ,यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाने मंगळवार ९ रोजी केली आहे.
शासनाने सुरुं केलेल्या अनलॉक मध्ये सशर्त अटी व नियमांचे पालन करून काही व्यवसाय सुरुं केले आहे , यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन ड्रोन कैमरेद्वारे प्रशासन नजर ठेवून आहे . या ड्रोन कमेऱ्याद्वारे जवाहर डेअरी रोडवर हातगाडी विक्रेत्यानी गर्दी केल्याचे दिसून आली तसेच शासनाच्या नियमांची पायमल्ली होऊन सोशल डिस्टनसिंगचा फज्ज़ा उडाल्याचे चित्र ड्रोन कैमे-याने दिसल्याने घटनास्थळी त्वरीत दिनांक ९ जून रोजी पथकाने बाजारातील फ़ळभाजी विक्रेत्यांच्या ८ हातगाड्या जप्त केल्या तसेच शहरातील मनीष मॉल, बिसमिलल्हा प्रॉव्हिजन, नमस्ते ऑटोमोबाईल, श्रीबाईक हाउस, असे चार दुकाने सील करण्यात येवून हातगाडी जप्त करीत संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली .
सदर कारवाई प्रांताधिकारी रामसिंग सुलाने उप जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी किरण सावंत पाटील , तहसीलदार दिपक धिवरे बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे अधिकारी पंकज पन्हाळे, सूरज नारखेडे, संजय बाणाईते, चेतन पाटील, राजीव वाघ, महेश चौधरी, राजू पाटील, विजय राजपूत, कृष्णा पाटील, किरण मंदवाडे, राजू नटकर, पोलिस कर्मचारी दीपक शिंदे या पथकाने केली .




