भुसावळातील न्यू चैतन्य गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्रभाग निरजंतुक करण्यासाठी फवारणी करून मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीकरीता घेतला संकल्प ;

https://youtu.be/-jjsM9qORSs


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधित रुग्नांची संख्या वाढत आहे , अश्या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षणास मदत व्हावी याकरीता येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील न्यू चैतन्य गणेश मंडळातर्फे सोडियम हाइड्रोक्लोरिनची फवारणी करून प्रभाग निर्जतुक करण्यात आला .तसेच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचा संकल्प न्यू चैतन्य मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी घेतला आहे .
यावेळी विठ्ठल मंदिर वार्ड , राम मंदिर वार्ड , बाजारपेठ पोलिस ठाणे, डेली मार्केट , यासह संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली . आपल्या देशासह राज्यावर मोठे संकट आले आहे .यासाठी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे गणेश मंडळ कार्यकर्ते यांनी कोरोनाच्या या कठिन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठरवले असून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे व खंबीर नेतृत्वाचे कौतुक करून गणेशोत्सवात मंडळावर खर्च न करता यंदा मुख्यमंत्री सहायता निधी करीता मदत करण्याचा संकल्प घेतला आहे . प्रसंगी मंदार बागुल , सनी चौधरीं, शुभम तळेले, पराग ब-हाटे , अजय चौधरीं , विजय चौधरीं ,गौरव तळेले, सागर कोळी , प्रवीण चौधरीं , आकाश कोळी , तुषार चौधरीं यांचेसह मंडळाच्या कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले .
.या निर्णयात्मक भूमिकेमुळे न्यू चैतन्य मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रभागातील नागरिकांनी कौतुक केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *