कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधांसह रावेर यावल मतदारसंघात १०० बेडच कोविड-१९ केअर सेंटर उभारण्यात यावे – अनिल चौधरीं यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; निवेदन सादर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 रावेर यावल मतदारसंघात १०० बेडच कोविड- १९ केअर सेंटर उभारण्यात यावी , कोरोना उपचार दरम्यान येत असलेल्या अडचणी जे कोरोना पेशंट नाही आहे अश्या पेशंटना होत असलेल्या गैरसोईं संबंधित तसेच खासगी डॉक्टर कोरोना सारख्या भयानक महामारी आजारात पेशंट बघत नाही अश्या डॉ रजिस्ट्रेशन शासनाने त्वरीत रद्द करावे  ,तसेच  पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती ओळखून दक्ष राहणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाद्वारे साथीचे आजार व गरजेच्या वेळी आवश्यक असणार्‍या औषधांची तयारी ठेवणे, नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व नालेसफाई, स्वच्छता व इतर कामे पुर्ण करण्यात यावी अशी मागणी देखील रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे  जनसेवक अनिल छबिलदास चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना राजेशजी टोपे यांच्या कडे भुसावळ भेटी दरम्यान केली असता रावेर यावल मदारसंघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या संकटात अत्यावश्यक सोयी सुविधांबाबत माहिती दिली. आवश्यक कामे लवकरच चालु केली जातील तसेच  तुमच्या मतदारसंघात कोणत्याही अडचणी असो कोणत्याही समस्या असो तुम्ही मला कॉल करा लागेल ती तुम्हला मदत करण्यात येणार असल्याचे   आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  आश्वासन दिल्याचे जनसेवक अनिल छबिलदास चौधरी यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *