भुसावळ शहरात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली सर्व पक्षीय आढावा बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळाची परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी दोन गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोलिसांनी कंट्रोल पॉवर वापरून योग्य व कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
कंटेन्मेंट झोनमध्ये कडक शिस्त ठेवली पाहिजे अशी अपेक्षा पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसेच शहरातील खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आली असल्याचेही निदर्शनास आले ,डॉक्टर्स यांनी हॉस्पिटल सुरू ठेवली पाहिजे असे न केल्यास दवाखान्यांचे परवाने रद्द करण्यात येऊन रजिस्ट्रेशन परवाना रद्द कारवाई करण्यात येईल. तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनला १२ कोरोना रुग्ण बाधित आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन क्वांरटाईन करून त्यांना विलगिकरन कक्षात ठेवून योग्य तो उपचार केला जाईल.सर्व जगात हीच पद्धत आहे.ज्या पोलीस स्टेशनला कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण मिळाले आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच भुसावळ शहर हॉटस्पॉट झालेले आहे. मृत्यु संख्या २७ झाली आहे.या सर्वाच्या दृष्टीकोनातून समन्वयांचा अभाव झालेला आहे तो दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहे.माहिती जमा करून याचे निदान झाले पाहिजे. टेस्टिंगच्या बाबतीत उशीर लागू नये.
लवकर रिपोर्ट पाठविण्याच्या सूचना दिल्या.क्वांरनटाईन व्यवस्था व्यवस्थित असावी.केव्हिड सेंटरला उपचार योग्य पद्धतीने करण्यात यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *