भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत विद्यार्थी अडीच महिन्यापासून घरात अडकलेले आहेत या काळात लॉक डाऊन चा उपयोग करत राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत सहभागी होऊन शोधनिबंध सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी असून त्याचा उपयोग केला पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे गव्हर्निंग बॉडी मेंबर किशोर राजे यांनी केले
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जळगाव, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लब वरणगाव व डॉ. सी व्ही रमण विपनेट क्लब, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक व बाल वैज्ञानिक यांच्यासाठी झूम ॲप द्वारे ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेच्या उद्घाटनाला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर राजेंद्र महाजन व जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक बी डी धाडी उपस्थित होते
यावेळी बोलताना किशोर राजे म्हणाले की विद्यार्थी घरांमध्ये सध्या कंटाळले आहेत विविध खेळ मोबाईल संगणकावरील गेम यामुळे त्यांच्यात पठारावस्था निर्माण झाली आहे शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांना अभ्यासामुळे वेळ नसतो यामुळे इतर शैक्षणिक उपक्रमाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते याकरिता विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या उपक्रमात सहभागी होऊन या वर्षाच्या विषयावरती शोधनिबंध तयार करण्याचे मार्गदर्शन पीपीटी द्वारे यावेळी केले तसेच प्रकल्प तयार करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास मदत होऊन शोध निबंध तयार करण्याची सवय जडते परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामवंत शास्त्रज्ञासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असते शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही उपक्रमात सहभागी होण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे यांनी करताना सांगितले की 10 ते 17 वयोगटातील शाळेतील अथवा शाळाबाह्य कोणत्याही विद्यार्थ्यांना या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळते या कार्यशाळेत प्रकल्प तयार करण्याबाबतचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे
कार्यशाळेच्या सुरुवातीला झूम ॲप वापरण्याबाबत जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सहसचिव संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
प्रकल्प तयार करण्याच्या मुद्देसूद पायऱ्या या विषयीची सविस्तर माहिती बालविज्ञान परिषदेचे शैक्षणिक समन्वयक बी बी जोगी यांनी दिली यावेळी जिल्ह्यातील बाल वैज्ञानिक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते अरे शाळेचे सूत्रसंचालन बी बी जोगी यांनी तर आभार संदीप पाटील यांनी मानले
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचे बीजारोपण होणे गरजेचे
आज संपूर्ण विश्वावर कोरोना विषाणूचे सावट आलेले आहे यामधून बाहेर पडण्यासाठी संशोधनाची गरज आहे आज विश्वाला संशोधकांची कमतरता जाणवत असून बाल विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये या संशोधनाचे धडे दिले पाहिजे तसेच त्यांच्यामध्ये संशोधनाचे बीजारोपण होणे गरजेचे आहे आणि आता हीच योग्य वेळ आहे या माध्यमातून आपण जगाला भावी शास्त्रज्ञ देऊ शकतो.
डॉ. राजेंद्र महाजन,
अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव
परिस्थितीवर केली मात
लॉक डाऊन च्या काळामध्ये राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शाळा बंद असताना देखील कार्यशाळा घडवून आणली यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल व विपरीत परिस्थितीत देखील मात कशी करता येते याचे उत्तम उदाहरण ऑनलाइन कार्यशाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या चमूने दाखवून दिले
बी डी धाडी,
जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक,
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जळगाव.



