भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला
दि.१६ जुन रोजी एक दिवसीय सामाजिक अंतरचे पालन करून धरणे आंदोलनाची नोटिस पीओएच प्रशासनाला आज दि.२ जुन मंगळवार रोजी देण्यात आली.
कोरोना महामारीत कर्मचा-यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन सोयी सुविधा न पुरवणे यात साबण, सॅनिटायझर व वर्कशॉपचे निर्जंतुकीकरण न करणे,वर्क शॉप मध्ये पाण्याची व्यवस्था न करणे,पदोन्नतीचे आदेश वेळेत न काढणे,एफआरसी पास रिनिव्हल न करणे,पीएफ पास बुक मध्ये जमा राशीची नोंद न करणे,आयकर फॉर्म क्र.१६ ए न देणे, इंसेंटिव एरियर्सचे तपशील न देणे,पावसाळ्या पूर्वी वर्कशॉपची दुरूस्ती न करणे
आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.
या वेळी सीआरएमएसचे झोनल सचिव पी.एन.नारखेडे,
पीओएच वर्कशॉपचे अध्यक्ष किशोर कोलते,सचिव डी.यू.इंगळे,कार्याध्यक्ष ईश्वर बाविस्कर,कोषाध्यक्ष विकास सोनवणे,अजीत अमोदकर, मेघराज तल्लारे,हरिचंद सरोदे, स्वप्निल पाटिल,दीपक खराटे, चंद्रकांत चोधरी,सुरेंद्र गांधीले, राजेश सोनी,संदीप येवले,गिरीश फालक,ताराचंद ब-हाटे,संदेश इंगळे आदी उपस्थित होते.



