कन्‍हाळा येथे गावठी दारु अड्‍ड्‍यावर पोलीसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील तालुका पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील
कन्हाळा गावातील मसंटी नाल्याच्‍या काठावरील झाडी झुडपात गावठी हातभट्‍टी दारू तयार केली जात असल्‍याची गुप्‍त माहीती मिळाल्‍याने भुसावळ तालुका पोलीसांनी धडक कारवाई केली.
या कारवाईत पिरू गंगा गवळी रा.कन्हाळा हा मसंटी नाल्याच्‍या काठावर गुळ,महू व नवसागर मिश्रीत रसायनापासुन तयार केलेल्या आरोग्यास धोकादायक गावठी हात भट्टी दारूची भट्टी रचुन चूलीवर दारू गाळतांना १५ ड्रम मध्ये २ हजार ९००लिटर कच्च्‍या रसायनासह गावठी हात भट्टीची ७० लिटर तयार दारू असे अंदाजे १ लाख ५ हजार ३० रू.किमतीच्‍या मालासह मिळुन आला.
या प्रकरणी त्याच्‍याविरुद्ध प्रोव्हीजन कायदा व संचारबंदी आदेशाचे अवमान केल्‍या प्रकरणी भादवी कलम ३२८,२६९,२७०,१८८ करोना उपाय योजना २०२०चे नियम २१ व भारतीय साथी कायदा कलम २,३,४ सह आपत्ती कायदा कलम ५१(ब)मु.प्रोव्ही.का.क.६५(फ)(ब(क(ई)गुन्हा दाखल करून त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोहेकाॅ.विठ्ठल फुसे,अजय माळी,युनुस शेख,पोकाॅ.प्रदीप ईंगळे,पोलिस पाटील रेवसिंग पाटील यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *