प.क.कोटेचा महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक पातळीवर व देशाअंतर्गत कोरोनाचे थैमान सुरू आहे मात्र ज्ञानदान व शैक्षणिक उपक्रमाची गरज लक्षात घेऊन येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात इंग्रजी विभाग व अक्षरा मल्टी डिसीप्लीनरी जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मे रोजी एक दिवसीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले. वेबिनार उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या व उद्घाटक कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मंगला साबद्रा त्यांनी सहभागी सर्व प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.
ज्ञानग्रहण करून स्वतःला समृद्ध करा : मंगला साब्रदा
सद्यस्थितीत येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन सेमिनारचे महत्त्व व उपयुक्तता यावर त्यांनी आपले विचार मांडले. रोजच्या दैनंदिन कामकाजात इंग्रजीचे महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत-जास्त प्राध्यापकांनी यात सहभागी व्हावे, अगदी वेबिनारच्या समारोपा पर्यंत सहभागी प्रतिनिधींनी ज्ञानग्रहण करून स्वतःला समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले. वेबिनारच्या प्रथम सेशनमध्ये डॉ.गिरीश पवार (युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद) यांनी रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थिती दिली.
वेबिनारमध्ये देशातील ३०५ प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग
‘विजय तेंडुलकरांचे नाटक’ जग या विषयावर त्यांनी सर्व बाजूंनी सखोल चर्चा केली. सेशन नंतर सहभागी प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली. वेबिनारच्या दुसर्‍या सेशनमध्ये डॉ.रमेश चौघुले, (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सब कॅम्पस उस्मानाबाद ) यांनी उपस्थिती दिली. ‘इंडियन इंग्लिश लिटरेचर : अँन ओव्हर्व्ह्यू ऑन न्यू ट्रेडस’ या विषयावर चर्चा केली. रीसोर्स पर्सन म्हणून त्यांनी विषयावर केलेली मांडणी अत्यंत समर्पक व अचूक असल्याचे अनेक सहभागी प्राध्यापकांनी मत नोंदविले. सेशननंतर विचारलेल्या प्रश्नांवर डॉ.चौघुले यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शंकांचे निरसन केले. महाविद्यालयाचे प्रा.निलेश गुरूचल यांनी कोऑर्डिनेटर, को एडिटर व तांत्रिक तज्ञ म्हणून भूमिका पार पाडली. डॉ.गिरीश कोळी यांनी एडिटर म्हणून कामकाज केले, डॉ.व्ही.एस.पाटील यांनी कन्वेनर या नात्याने सूत्रसंचालन केले. वेबिनार च्या यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्षा श्रीमती पदमा कोटेचा, महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. शिल्पा पाटील ,उपप्राचार्य डॉ. जे. व्ही.धनवीज इ. चे मार्गदर्शन लाभले. सदर वेबिनारमध्ये देशभरातून जवळपास ३०५ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *