भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जय गणेश फाऊंडेशन तर्फे परिसरातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
शहरात सर्वत्र कोविड १९ च्या विषाणूमुळे कोरोनाच्या आजाराने कहर केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जय गणेश फाऊंडेशन तर्फे आर्सेनिक अल्बम३० ह्या होमिओपॅथिक गोळ्यांचे घरपोच मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे,समन्वयक अरुण मांडाळकर, गणेश फेगडे, सचिव तुषार झांबरे, संदीप दुसाने,देवेंद्र राजपूत, हर्षल वानखेडे, अरुण पाटील, अतुल भारंबे, मोहित पवार, भूषण पाचपांडे, शुभम नेमाडे, राहुल भावसेकर, सूर्यकांत दुसाने, महेंद्र महाजन, किशोर बढे, विनोद चौधरी, राजेंद्र यावलकर, खेमचंद्र भंगाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



