भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ शहरात सिंधी कॉलनीतील शिव मंदिरा जवळील एका बंद घरात २३ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास काही लोक आपले स्वत:चे फायदयासाठी पैशांवर जुगाराचा खेळ खेळीत असल्याची गुप्त माहीती पोलिस निरीक्षकांना मिळाल्याने या ठिकाणी छापा टाकून १० जणांसह जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ताब्यात घेतली .
सिंधी कॉलनी भागातील शिव मंदिरा जवळील एका बंद खोलीत जुगार खेळ खेळीत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी पोलीसअधिक्षक पंजाबराव उगले, जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके ,उपविभागीय पोलीसअधिकारी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत बाजार पेठ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप परदेशी ,सपोनि अनिल मोरे ,पो.ना.रविंद्र बि-हाडे,रमण सुरळकर, महेश चौधरी,उमाकांत पाटील,तुषार पाटील पो.कॉ.कृष्णा देशमुख,विकास सातदिवे,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी, बंटी कापडणे यांना रवाना केले. घटनास्थळी बलराम ऊर्फ (बंटी) आनंदराम रोयडा वय ३३, प्रकाश राजकुमार चांदवाणी वय ३१, सुमीत महेश कुमार वालेचा वय २५, दिपक विष्णुदास आहुजा वय ४० ,आकाश श्रीचंद कामनानी वय २५ , बाबु रमेश आहुजा वय ३१,राकेश शामलाल आगीचा वय ३६,अजय अरुण कुमार मेघराज वय २९,प्रवीण घनश्यामदास कुकरेजा वय ३०,लक्ष्मण कन्हैयालाल शर्मा वय ४७, सर्व रा.सिंधी कॉलनी यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ १८,७५० (अठरा हजार सातशे पन्नास) /- रु.रोख व ५२ पत्याचा कँट व पत्ता जुगाराची साधने मिळुन आली.म्हणुन या सर्व संशयीत आरोपींवर भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग ६ गु.र.न ५६० /२०२० मु.जु.अँक्ट क.१२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास स.पो.नि संदिप परदेशी करीत आहे.



