भुसावळातील कोरोणा युद्धातील लढवैय्ये यांचा मानपत्र देवून केला सन्मान ; सखी श्रावणी महिला संस्था व जनमत प्रतिष्ठानचा उपक्रम


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषारी वायुच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉकडाऊन सारख्या परिस्तिथीत जिवाची पर्वा न करता सर्व लोकांनी आपल्या घरात सुखरूप राहावे या साठी अहोरात्र विविध रूपाने विविध मार्गाने अहोरात्र झटणाऱ्या या योध्द्याचे मनःपूर्वक कौतुक करून आभार व्यक्त करावे या अनुषंगाने येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था भुसावळ व जनमत प्रतिष्ठान,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातिल कोरोनाच्या लढाई मधील लढवैय्या यांचा मानपत्र देवून शुक्रवार रोजी सत्कार करण्यात आला .
यामध्ये जिवाची पर्वा न करता २४ तास ड्युटी करणारे पोलीस, व पेट्रोल पंपवाले, नगरपालिका डॉक्टर, नगरसेवक, पत्रकार , साई सेवाचे कार्यकर्ते प्रवीण (छोटू )वारके, नगरसेवक पिंटू कोठारी, सोनी बारसे, नितीन धांडे, शिशिर जावळे, खा खडसे यांचे सीएसआय पिंपळे ,यांना सन्मान पत्र देण्यात आले .
जनमत प्रतिष्ठान, अध्यक्ष पंकज नाले, व सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्षा सौ. राजश्री नेवे, उपाध्यक्षा सौ. माया चौधरी व हर्षाली पाटील आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *