भुसावळ(प्रतिनिधी )-
पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून भुसावळ येथे रहिवासी मोहम्मद अजहर खान फरीद खान यांची मुलगी अरीबा मोहम्मद अजहर खान या ५ वर्षीय चिमुकलीने रमजान महिन्याचा आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला. सद्ध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे ४-३० वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत एक रोट आणि पाण्याच्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने अल्लाह( ईश्वर ) प्रति श्रद्धा व्यक्त केली. आपला
भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाहला या मुलीने साकडे घातले.कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



