भुसावळ (प्रतिनिधी )-
गावठी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करतांना भुसावळ तालुका पोलिसांनी संशयीत आरोपी जयसिंग किसन इंगळे ( मिरगव्हान) यास सार्वजनिक जागी दोन कॅन मध्ये ६० लिटर अंदाजे ५ हजार ४०० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करतांना ताब्यात घेतले .
संशयीत आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात प्रोव्ही कायदा अन्वये आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाची अवमानता केली म्हणून भादवी कलम २७०, १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक्क फौजदार सुनील चौधरी, पो हे कॉ विठ्ठल फुसे, संजू मोंढे ,विजय पोहेकर ,जगदीश भोई ,होमगार्ड सेकोकारे ,यांनी केली आहे.



