मुंबई :
कोरोना विषाणू साथीमुळे मागील दिवसांपासून संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू आहे. हातावर पोट असणाऱ्या मजूर गोरगरीब जनतेचे खुप हाल होत आहेत. त्यांना थोडाफार मदतीचा हात द्यावा या उद्देशाने ऐरोलीतील प्रभाग 12चे नगरसेवक संजू आधार वाडे यांच्या माध्यमातून धान्य, मास्कचे वाटप करून सोसायटीमध्ये कोरोना व्हायरस जंतू नाशक औषध फवारणी स्वखर्चाने करण्यात आले आहे.
नवी मुंबई प्रभाग नंबर 12 मध्ये संजू आधार वाडे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १५ सेक्टर १४ येथील मंगलदिप सोसायटी अन्य सर्व सोसायट्यांचे वाॅचमन, सफाई कामगार, रोजंदारी कामगार यांना धान्याचे वाटप करून सोसायटीतील प्रत्येक घरों घरी जाऊन कोरोना व्हायरस जंतू नाशक औषध फवारणी स्वखर्चाने करून मास्क वाटप ही करण्यात आले.तसेच प्रभागातील नेव्हा ग्रार्डन येथे नाशिकचा भाजीपाला ही वाटप करण्यात आला आहे. फवारणी करून घेतली त्या वेळी सोसायटीतील पदाधिकारी उपस्थित होते



