भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना कोवीड १९ या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजविला असून आपल्या देशाला सुध्दा त्याचा फटका बसला आहे.अशा नाजुक परिस्थितीत भुसावळ विभागातील ८ रेल्वे कर्मचा-यांनी पुढाकार घेत कोरोना कोवीड १९ च्या लढ्यात केंद्र सरकारला मदतकार्य केले आहे. विभागातील बडनेरा येथील मालगाडी गार्ड दिलीप सिंग सरदार सिंग,नांदगाव येथील मालगाडी लोको पायलट सतीशचंद्र जे.गीते व भुसावळ येथील विद्युत टिआरएस मधील तंत्रज्ञ रविंद्र चिखलकर या तिघांनी आपला एक महिन्याचा पुर्ण मुळ पगार,भुसावळ सी.अॅन्ड.डब्ल्यु विभागातील कार्यालय अधिक्षक (कार्मिक) मंगेश कुळकर्णी ५० हजार,भादलीचे उपस्थानक व्यवस्थापक दिपक रामदास चिलवंत व प्रयोगशाळा अधिक्षक ओम प्रकाश पांचोली प्रत्येकी ११ हजार रु.व भुसावळ कार्मिक विभागातील कनिष्ठ लिपीक चुमूनसिंह व रेल्वे स्कुलच्या सहा य्यक शिक्षीका संध्या यु.वसावे या दोघांनी आपला दोन दिवसांचा मुळ वेतन पीएम केअरला दिला आहे.



