भुसावळ (प्रतिनिधी )-
श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्याना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन महिन्याचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दीपक धांडे यांनी १७ एप्रिल रोजी भुसावळ तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या भुसावळ विभागात श्रावण बाळ योजनेतील एकूण लाभार्थी २,६४८ आहे त्यातील एस सी कोठ्यातील लाभार्थी सख्या ४८२ असून एस टी लाभार्थी सख्या ७८ इतकी आहे व जनरल श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी सख्या २०८८ असून एससी व एसटी लाभार्थ्यांना फेबरुवारी व मार्च या दोन महिन्याचे अनुदान मिळालेले आहे परंतु जनरल कोट्यातील २०८८ लाभार्थीना आज पर्यंत फेब्रुवारी व मार्च पर्यंतचे अनुदान मिळालेले नाही त्यामुळे श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ लाभार्थी रोज बँकेत जाऊन लांब लांब रांगेत दोन दोन तीन – तीन घंटे उभे राहत आहे व बँकेत अनुदान न जमा झाल्या ने पुन्हा आपल्या नशिबाला दोष देऊन घरी येत आहे.
श्रावण बाळ योजनेतील ऑफिस मध्ये विचारणा केली असता तेथील अधिकारी राज्य सरकार चा श्रावण बाळ योजनेतील २०८८ लाभार्थ्यांच्या ३,९२७,२००रूपये निधी आला नसल्याचे सांगतात जर श्रावण बाळ योजना सर्वासाठी सारखीच आहे तर एस सी एस टी चां निधी आला व जनरल चां निधी आला नाही हे न पटणारे आहे
म्हणून दीपक धांडे यांनी तहसीलदार यांना आपण या निधी संदर्भात वैयक्तिक लक्ष देवून श्रावण बाळ योजनेतील जनरल लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात फेब्रवारी व मार्च महिन्याचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी दीपक धांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .



