नवी मुंबई (प्रतिनिधी )-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिप्रेत असणारे अभिवादन करण्यात आले. नवी मुंबई सीवूड करवेगाव येथे असंख्य हातमजूरी करून आपल्या उदरनिर्वाह करिता बाहेरील जिल्ह्यातून कामाकरिता येथे आलेले आहेत.त्यात काही निराधार महिला सुद्धा आहे. परंतु कोरोना आजाराच्या महामारीमुळे त्यांच्यावर अत्यन्त संकटमय परिस्थिती येऊन पडली असता सध्या संचारबंदी मुळे त्यांना आपल्या गावी जाणे शक्य नाही.अशा परिस्थितीत ह्याची दाखल घेऊन नवी मुंबई जिल्हा अन्तर्गत भारतीय बौद्ध महासभा सीवुड शाखा नवी मुंबई च्या माध्यमातून महाराष्ट्र अध्यक्ष यु.जी.बोराडे गुरुजीं व नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष जयवंत लव्हांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीमुंबई जिल्हा उपाध्यक्ष जे.के. वाडते, नवीमुंबई जिल्हा सचिव संजय झनके, सिवूड शाखा संघटक गणेश ओव्हाळ, .राहुल कुसरे ह्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती साजरी करण्याच्या उदान्त हेतूने भुकेल्याला अन्न व जीवनावश्यक वस्तू वाटप करून संचारबंदी होईपर्यंत ऐकून 50 कुटुंबाचा खर्च भारतीय बौद्ध महासभा ह्यांनी उचलला असून ह्या सर्व कुटूंबाना लॉक डाउन संपेपर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी ह्यावेळी त्यांना गहू,तांदूळ, साखर, तेल इत्यादी सह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहे.



