भुसावळ- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लोकडाऊन सुरू आहे.यामुळे दररोज कमावणारे व खाणारे कुटुंबांना खूप त्रास होत आहे. अशा कुटुंबांसाठी दावत-ए- इस्लामी हिंद संपूर्ण भारतात कोरोनाव्हायरस वेल्फेअर मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत गरीब गरजू निराधार कुटुंबांना १२०० रुपये रोख व धान्य वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत भुसावळमध्येही अशा ४० कुटुंबांना आज दि.१४ एप्रिल रोजी प्रत्येकी १२०० रु. रोख रक्कम व १५० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. या उफक्रमात भुसावळ शहर प्रमुख इम्रान अत्तारी,हाजी तनवीर, रफिक कादरी,युसुफ खान,सैय्यद साबीर,हाजी शाकीर,सईद अत्तारी, रफिक रोशन यांनी परिश्रम घेतले.



