विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्‍याचे आवाहन;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्याची परिस्थिती लक्षात घेता १४ एप्रिल रोजी विश्र्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नेहमीप्रमाणे एकत्र येऊन साजरी करु शकत नाही याची खंत आहेच पण यावेळी ही जयंती अनोख्या पध्दतीने आपल्या घरीच साजरी करा असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील मान्‍यवरांनी अनुयायींना केले आहे. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे १४ एप्रिल रोजी ११ वाजता आपण आपल्या कुटुंबियांसह घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना वंदन करुन अर्थात सर्वांनी ठरलेल्या एकाच वेळी बुध्द वंदना ग्रहण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया तसेच हे विश्व कोरोना व्हायरसपासुन मुक्त व्हावे या मैत्री भावनेने आपल्या सर्वांच्या बुध्द वंदनेचा आवाज अख्या विश्वात व देशात घुमेल असा विश्वास आपण सर्वांनी बाळगावे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले होते की, मी प्रथम व अंतिम देखील भारतीय आहे तेच मनात धरुन आपल्यांना सामंजस्यपणा दाखवायचा आहे. आपल्या देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून करावयाचा आहे. आपल्या देशातील घटना ही आपल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली आहे.आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत हेच मनात धरुन आपण सर्वांनी आपल्या बाबांची जयंती शांत पध्दतीने आपापल्या परिवारासोबत साजरी करावी असे राजु सुर्यवंशी,रमेश मकासरे, जगन सोनवणे,विनोद सोनवणे, उल्हास पगारे,रवि सपकाळे,गिरीष तायडे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *