प्रभाग क्रमांक १६ मध्ये नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी यांच्याकडून जीवनावश्यक किराणा वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र अश्या परिस्थितीत समाजातील दान-शूर मदतीसाठी पुढे सरसावले आहे. त्यात भुसावळ येथील नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी यांनी प्रभाग क्रमांक १६ शनी मंदिर भागात नागरिकांना जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप केले. तेल, सर्व प्रकारच्या डाळी, पीठ, साखर, मीठ, चहा पावडर, तूप, साबण, मसाला आदी जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
संतोष(दाढी) चौधरी यांच्यासह प्रकाश चौधरी, शंकर चौधरी, सुरेश चौधरी, भूषण चौधरी, महेश चौधरी, योगेश चौधरी, जय चौधरी व कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *