भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरीना संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला दैनंदिन आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत शहरातील गर्दीचे प्रमाण वाढत आहे ती कशाप्रकारे नियंत्रणात आणता येईल या मुद्यावर जास्त प्रमाणात भर देण्यात आले. शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 10वाजेला आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात दैनंदिन आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीस आमदार संजय सावकारे,उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,तहसीलदार दिपक धिवरे, नगर परिषद मुख्याधिकारी करुणा डहाळे तसेच पालिका अधिकारी यांचेसह बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदी उपस्थित होते .
शहरातील नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहे.कोणीही घराबाहेर निघू नये.सर्वांनी घरातच बसावे.प्रशासनाला सहकार्य करावे.यासाठी प्रशासन अविरत कार्य करीत आहे प्रशासनाच्या या चांगल्या कामगिरीमुळे भुसावळ तालुक्यात अद्याप पावेतो एकही कोरोना संक्रमित (पॉझेटीव्ह )रुग्ण मिळालेला नाही ही चांगली बाब असल्याचे दिसून आले आहे. यासाठी प्रशासन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कुठल्या उपाय योजना केल्या पाहिजे यासाठी आमदार यांच्या उपस्थितीत दैनंदिन आढावा बैठक घेतली जात आहे.
भाजीपाला बाजाराच्या लिलावासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. दैनंदिन बाजार पाच ठिकाणी भरविण्यात आलेला आहे.गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन वेळोवेळी दक्षता घेत आहे. परिसरात सॅनेटायझरची नगरपरिषदेव्दारे फवारणी केली जात आहे.सोशल डिस्टनचा वापर करण्याच्या सूचना स्पीकर द्वारे दिल्या जात आहे.शहरात कुठेही जमाव होणार नाही यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत आहेत.जागोजागी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे. वाहतून शाखेचे प्रभारी अधिकारी काशिनाथ सुरळकर व कर्मचारी शहरात वाहनाने पेट्रोलिंग सातत्याने सुरु आहे . संचारबंदीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 प्रमाणे कारवाई केली जात आहे. तसेच शहरात राष्ट्रीय मार्गावर गांधी पुतळ्या जवळ नाकाबंदी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर जाण्यास बंदी घालण्यास आलेली आहे.तालुका पोलीस स्टेशनला हातभट्टी विक्रेत्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे.बाजारपेठ पोलीस स्टेशन कारवाईच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे.
शहरातील काही भागात नागरिक प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे. अशा दोषींवर लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासन पुढील भूमिका काय घेते.यासह काही महत्वपूर्ण बाबतीत घेतलेले निर्णय गोपनीय ठेवले असून शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वानी एकजुटिने कार्य करावे तसेच नागरिकांनी घरात राहावे , असे आवाहन करण्यात आले .



