भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता तसेच लागू असलेल्या संचारबंदीत कोणीही कायदयाचे उल्लंघन करु नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन वजा सूचना तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याकडून साकेगाव येथे ग्रामस्थांना ध्वनिक्षेपनाद्वारे करण्यात आले .
साकेगाव येथे कोरोना संदर्भात बाहेर गावातील नागरिकांना गावात प्रवेश बंदी असून कुणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी तसेच कुणीही ही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी संपूर्ण गावात फेरफटका मारून सक्त ताकीद वजा सूचना केलेल्या आहेत तरी ग्रामस्थांनी सूचनेचे पालन करावं व प्रशासनाला सहकार्य करावे अशी रास्त अपेक्षा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन करीत आहे. गावात बंदोबस्तासाठी भुसावळ तालुका पोलीस प्रशासन सर्व पोलिस कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.



