भुसावळात महादेव ट्रेडर्स मधून तेलाचे डबे लांबविले; दुकानदारांमध्ये भीती

भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू असून जीवनावश्यक वस्तूं व्यतिरीक्त अन्य दुकाने बंद आहेत.पोलिस विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहे .अश्या परिस्थितीचा फायदा मात्र चोरांनी घेतला .
येथील डेली मार्केटच्या बाजूला असलेल्या महादेव ट्रेडर्स या दुकानाच्या छताचे पत्रे उचकवून चोरांनी दुकानात प्रवेश करून खाद्य तेलाचे २१ डबे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे
चोरुन नेले. याबाबत दुकानाचे मालक संदीप जमनानी यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात चोरीची माहिती दिली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
आधीच कोरोनाचे सावट त्यात चोरांचा सुळसुळाट यामुळे व्यापार्‍यांमध्ये भीती पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *