भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलट कर्मचारी यांचा शुक्रवार रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. पत्नीसोबत ऑस्ट्रेलिया भ्रमणासाठी रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलट गेले होते त्यामुळे परदेश ते पुणे व पुणे ते भुसावळ असा प्रवास मयत रुग्ण यांचा झाला त्यात शुक्रवारी त्यांचा मृत्यु झाला मात्र कोरोनामुळे त्यांचा मृत्यु झाल्याची भीती सर्वत्र पसरली .लोकांसह प्रशासन सुद्धा हादरले त्यांनी अत्यंत दक्षता घेत मृतासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुक्रवारी रात्रीच जळगावात तपासणीसाठी रवाना केले होते. या रुग्णाच्या अहवाला बाबत सर्वाना प्रतीक्षा होती . रविवारी रात्री या रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने यंत्रणेसह भुसावळकरांना मोठाच दिलासा मिळाला आहे. मयतासह कुटुंबियांचा अहवाल निगेटीव्ह आल्याच्या वृत्ताला पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दुजोरा दिला.

जळगावनंतर भुसावळात पसरली होती भीती
जळगावच्या मेहरूणमधील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती तर भुसावळातील रेल्वे विभागातील सेवानिवृत्त लोकोपायलटचाही शुक्रवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू ओढवला होता मात्र या रुग्णाची हिस्ट्री पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून या रुग्णासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय चाचणीही केली होती मात्र सुदैवाने या रुग्णासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याने भुसावळकरांसह यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
परदेशावरून परतलेल्यांनी माहिती देण्याचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग दक्ष असलातरी काही नागरीक परदेशावरून तसेच मुंबई, पुण्यावरून आल्यानंतरही माहिती लपवत आहेत मात्र नागरीकांनी स्वतःहून नगरपालिकेच्या दवाखान्यात आपली नाव नोंदवावीत, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी केले आहे


