भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तथा संचारबंदी मुळे ओढवलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत
आपल्या प्रभागातिल नागरिकांची सुरक्षा लक्षात घेवून
प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका सौ धांडे व रॉ कॉ चे शहर अध्यक्ष नितीन धांडे यांच्या बतीने प्रभागातील गंगाराम प्लॉट, कोलते गल्ली ,गौतम नगर आदी ठिकांणच्या जवळपास ५५०
लोकांना घरपोच मुबलक भाजीपाला यात भेंडी ,मीरची, ढेमसे, टोमॅटो, वांगे ,पत्ताकोबी, फुलकोबी ,वाटप करण्यात आली .
नागरिकांनी बाजारात विनाकारण गर्दी करु नये ही गर्दी कमी करण्याकरीता तसेच ज्यांचे कडे काम नाही म्हणून अडचणी निर्माण झाल्या अश्या गरजु करीता एक हात मदतीचा या उद्देशाने एक आठवडा पुरेल ईतका मुबलक भाजीपाला सोमवार रोजी वाटप करण्यात आला .
धांडे दांपत्यांच्या दातृत्वाची प्रत्यक्ष प्रचिती नागरिक अनुभवत असल्यावे त्यांनी धांडे यांचे कौतुक करीत त्यांना आशीर्वाद दिले .



