वरणगांव येथे ग्रामिण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या युवकांना डॉक्टर व पोलीसाकडून शिविगाळ

वरणगाव (प्रतिनिधी )-
कोरोना विषारी वायुच्या पार्श्वभूमिवर वरणगाव ग्रामिण रूग्णालयात बाहेरगाव हुन आल्यानंतर तपासणीसाठी रांगेत उभे असतांना डॉ क्षितिजा हेडावे यांनी शिविगाळ केली व पोलीसांना बोलावुन मारहाण करायला लावल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे
यांबाबत माहिती अशी कि मुंबई , पुणे व बाहेरगांव येथे शिक्षण घेणारे . व नोकरी करणारे युवक तपासणीसाठी आले असता ते रितसर रांगत उभे होते , यावेळी तीन दिवसापासुन रुग्णांचा वाढती संख्या मुळे संतापात असणा -या डॉ क्षितिज हेंडवे चा पारा चढला त्यांनी . संताप शिव्या देवुन व्यक्त केला व पोलीसांना बोलाविले पोलीसांनी विचार न करता अश्लील शिविगाळ करून मारहाण केली व चार पाच युवकांना पोलीस स्टेशनला नेले , मारहाणीत दोन जणांचे हाताला दुखापत झाली आहे ही बहुतांश मुले खेडयावरची आहे , वरणगांवा तील सर्व आजी भावी नगरसेवक पक्षअध्यक्ष , कधी रुग्णालयात न दिसणारी रुग्णालय आरोग्य समिती सदस्य कोरोनाच्या धास्तीने वा पोलिसांच्या दहशतीने आपल्या घरात बसुन होते , तेथे युवकांची समजुत सहायक पोलीस निरिक्षक संदीप कुमार बोरसे यांनी घातली , शासनाने बाहेरगाव हुन येणाऱ्यांनी तपासणी करावी व यासाठी पोलीसांनी , वैदयकिय अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी , उर्मट वागणाऱ्या वैदयकिय अधिकाऱ्यावर वरीष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे

आरोग्य सेवा कोलमडली
वरणगाव सह परिसरात 27 खेडे आहेत याठिकाणी बाहेर गावला काम करणारे व शिक्षण घेणारे यांची संख्या जास्त आहे ही लोकं गावाकडे परतत आहे गावातील ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच आशा स्वयंसेविका त्यांना स्वतःची तपासणी करून घेण्यास सांगतात यामुळे ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासणीसाठी मोठी रीघ लागत आहे हे याठिकाणी जास्ती चे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ची गरज आहे यासाठी शहरातील डॉक्टरांची मदत घेतल्यास नक्कीच हा ताण कमी होऊ शकतो याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर देवर्षी घोषाल यांची नियुक्ती आहे मात्र अशाही परिस्थितीत ते अनुपस्थित दिसतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *