कोरोनामुळे तब्बल 22 एक्सप्रेस गाड्या रद्द ; भुसावळ विभागातून धावणाऱ्या अठरा गाड्यांचा समावेश

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणू चा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातून धावणाऱ्या अठरा गाड्यांचा समावेश आहे.
प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यस्ततेमुळे COVID -19 गाड्या रद्द केल्या
कोरोना विषाणूचा परिणाम आणि गाड्यांचा व्यस्तता टाळण्यासाठी मध्य रेल्वेने गाड्या रद्द केल्या आहेत.
यात गाडी क्र. ११२०१ डाउन एलटीटी-अजनी एक्सप्रेस दि. २३ ते ३० मार्च तर गाडी क्र. ११२०२ अप अजनी – एलटीटी एक्सप्रेस दि. २० ते २७ मार्च दरम्यान. गाड़े. क्र. ११४०१ डाउन मुंबई नागपुर नंदीग्राम एक्सप्रेस दि. २३ मार्च ते १ एप्रिलपर्यंत गाडी क्र. ११४०२ अप नागपुर – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस दि.२२ ते ३१ मार्च दरम्यान. गाडी क्र. ११४१७ डाउन पुणे नागपुर हमसफर एक्सप्रेस दि.२६ मार्च आणि दि.२ एप्रिल रोजी. गाडी क्र. ११४१८ अप नागपुर पुणे हमसफर एक्सप्रेस दि. २०, २७ मार्च रोजी. गाडी क्र. १२११७/ १२११८ डाउन एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस दि. १८ ते ३१मार्च दरम्यान. गाडी क्र.१२११८ अप मनमाड – एलटीटी गोदावरी एक्सप्रेस दि. १८ ते ३१ मार्च दरम्यान. गाडी क्र. २२१३९ डाउन पुणे अजनी एक्सप्रेस दि.२१ व २८ मार्च रोजी. गाडी क्र.२२१४० अप अजनी पुणे एक्सप्रेस २२ ते ३१ मार्च दरम्यान. गाडी क्र. २२२२१ डाउन मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस दि. २०, २३, २७,३० मार्च रोजी. गाडी क्र. २२२२२ अप हजरत निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस दि. २१, २४, २६, ३१ रोजी.गाडी क्रमांक १२२६१ डाउन मुंबई हावड़ा दुरंतो एक्सप्रेस यह प्रस्थान स्टेशन से दिनांक २५.०३.२०२० और दिनांक ०१.०४.२०२० को रद्द रहेगी. गाडी क्र. १२२६२ अप हावडा मुंबई दुरंतो एक्सप्रेस दि. २४ ते ३१मार्च दरम्यान.गाडी क्र. २२१११ डाउन भुसावल नागपुर इंटर सिटी एक्सप्रेस दि.१८ ते २९ मार्च दरम्यान. गाडी क्र. २२११२ अप नागपुर भुसावळ इंटर सिटी एक्सप्रेस दि. १९ ते ३० मार्च दरम्यान. गाडी क्र. ११२०५ डाउन एलटीटी – निजामाबाद एक्सप्रेस दि.२१, २८ मार्च रोजी. गाडी क्र. ११२०६ अप निजामाबाद -एलटीटी दि.२२ ते २९ मार्च रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी हा बदल लक्षात घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *