अकोटच्या गुन्हयातील फरार आरोपी भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )-
अकोट शहर पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळातून बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले .
अकोट जिल्हा अकोला पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार कासम यांनी कळविले की अकोट पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ८०/३०२० भा .द. वी .कलम-३०२,३४ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे दाखल गुन्हयातील फरार आरोपी गणेश उर्फ पिंट्या मुरलीधर महाजन वय-२४ रा दिनदयाल नगर भुसावळ याची माहिती काढून त्यास दिनांक ५ मार्च रोजी रात्री 3 वाजता ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता अकोट शहर पोलिसांच्या ताब्यात दिले .
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके ,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. विकास सातदिवे व पो कॉ.चेतन ढाकणे यांनी ही कार्यवाही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *