सटोऱ्यांचा डाव उधळला ; सट्टाच्या अड्यावर छापा ;तीन अटकेत:एक फरार ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरातील गांधी नगर भागातील सट्टा अड्डयावर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करून तीघांना अटक केली असून यातील एक संशयीत फरार असून बाजारपेठ पोलिसांनीं कारवाई केली आहे .या कारवाईने शहरातील सटोऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
येथील गडकरी नगर भागात राजू आवटे यांच्या घराच्या आडोशाला सार्वजनिक जागी कल्याण नावाचा सट्टाचा खेळ स्वतःच्या फायद्यासाठी खेळला व खेळवला जात असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली यावरुन सपोनी
संदीप परदेशी,सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, पो.ना. रविद्र बिऱ्हाडे, महेश चौधरी,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,पो.काॅ. विकास सातदिवे कृष्णा देशमुख,दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव अशांना घटनास्थळी जाऊन आरोपी हर्षद सुनील शिंदे वय २५, विनोद पांडुरंग गणपत वय ४५, दिपक सिताराम पाटील वय ३५ सर्व राहणार गांधी नगर भागातील असून यांच्याकडून सट्टा खेळण्याचे साहित्य व ६०० रुपये रोख जमा करण्यात आले असून यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी पोना महेश एकनाथ चौधरी यांनी दिल्यावरून गुरुन ८७/२०२० भाग-६ कलम मुंबई जुगार अँक्ट १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे तर एक आरोपी फरार झाला आहे.पुढील तपास पोना महेश चौधरी करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *