भुसावळात ११ रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबीर

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ परीसरातील नागरिकांच्या निरोगी व निरामय आयुष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगाव रोड विभागात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दिनांक ११ मार्च २०२० रोजी सकाळी ८ ते ११ पर्यंत मुक्ताईकॉलोनी, नगरपालिका शाळा क्रमांक १ समोर, जळगाव रोड येथे शिबिरामध्ये स्त्री रोग, दंत रोग, हृदयरोग, मधुमेह, मोतीबिंदू व नेत्ररोग, फिजियोथेरेपी तसेच अस्थीरोग तपासणी सोबत बी.एम.डी. मशिनद्वारे हाडातील कॅल्शियम मोफत तपासले जाईल. सीबीसी, कोलेस्टेरॉल, एच आय व्ही, संधीवताच्या रक्त चाचण्या मोफत केल्या जातील.
मोफत नाव नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन शिबिराचे संयोजक प्रा.धिरज गणेश पाटील, यतीन दत्तात्रेय ढाके, विशाल प्रल्हाद ठोके, शंतनू गणेश पाथरवट, उदय बोंडे, ललित नेहेते, लव झाडगे, अमोल पाटील, अशोक बेंडाळे, किशोर चौधरी, टिकाराम राणे, सुनील बऱ्हाटे, भूषण ठोके, सुरज चौधरी, दिनेश खैरनार, प्रवीण पाटील, श्याम खैरनार, विकास झांबरे, भूषण राणे, दुर्गेश पाटील, चंद्रकांत पाटील, दिनेश भंगाळे, रमेश भोई, सुनील भोई, रतिलाल कोळी, मनोज तडवी, भागवत पाटील, रमेश भावसार, प्रकाश पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *