भुसावळ (प्रतिनिधी )-
महिलांनी संसारातच गुरफ़टून न राहता स्वतःचेही छंद जोपासावे. मुलं व पती यांच्या व्यापात असतात अशा वेळी महिलांना एकटे राहिल्यामुळे मानसिक तणाव येवू शकतो म्हणून त्यांनी त्यांना आवडणार्या गोष्टीत मन गुंतवावे असे मार्गदर्शनपर प्रतिपादन पालिकेच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फ़लटणकर यांनी केले.
येथील साईलिला महिला बचत गटातर्फ़ेरानातला महादेव हुडको कॉलनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित वैद्यकिय मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. फ़लटणकर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमात महिलांना मोफ़त आर्यन व हिमोग्लोबिनच्या गोळ्यांचे वाटप देखील करण्यात आले.प्रसंगी दुसर्या प्रमुख वक्त्या ऍड.वैशाली चौधरी यांनी सांगितले की, सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत तसेच नुकसानही आहे. आजची तरूण पिढी मोबाईलमुळे चुकीच्या मार्गांना लागत आहे. यापासून मुलामुलींना कसे सांभाळावे या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.सुषमा खानापूरकर यांनी महिला दिन व महिला मुक्ती या दोघांमधील फ़रक सांगून संसार करतांना महिलांनी नोकरी व संसार यात समन्वय कसा साधायचा यावर मार्गदर्शन केले. प्रस्तावना बचत गटाच्या अध्यक्षा सौ.जास्वंदी भंडारी यांनी केले.सुत्रसंचलन सौ.नेहा यावलकर यांनी केेले तर आभार सौ.मंगला सुलाखे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बचत गटाच्या सभासद सौ.मनिषा भंडारे, सौ.सुनिता राणे, सौ.वैशाली चौधरी, प्राजक्ता गंधे, मनिषा बर्हाटे, संध्या चौधरी, सौ.रेखा बर्हाटे, अनिता राणे, हर्षदा चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.




