भुसावळ-येथील मॉर्डन रोडवरील अग्रेसन भवनाच्या आडोश्याला दि.५ मार्च रोजी रात्री एक इसम विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठचे पोनि.दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,पोना रविंद्र बि-हाडे,रमण सुरळकर, महेश चौधरी पोकॉ.कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी संशयित आरोपी गणेश कडुबा बाविस्कर (वय ३२) रा.दिनदयाल नगर,नाहाटा महाविद्यालयाजवळ भुसावळ यांस ताब्यात घेतले.त्याच्या चौकशीत २ हजार ४४४ रु.किमतीच्या देशी टँगो कंपनीच्या ४७ बाटल्या व १ हजार ९८० रु.किमतीच्या टुबर्ग कंपनीच्या १२ बिअरच्या बाटल्या असा एकुण ४ हजार ४२४ रु.किमतीचा माल मिळुन आला.या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात प्रोव्हीशन गु.र.न.८२/२०२० महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना यासिन पिंजारी हे करीत आहे



