भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे द्वितीय वर्ष कला, तृतीय वर्ष कला,प्रथम वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना बँकिंग विषयाच्या प्रात्यक्षिक करिता यूनियन बैंक ऑफ इंडिया शाखा, भुसावल येथे भेट दिली. त्या शाखेचे मॅनेजर सय्यद रसूल यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या विविध सेवेंबद्दल माहिती दिली. तसेच बँकेत खाते उघडायचे फॉर्म भरतांना काय काळजी घ्यावी, खाते प्रकार, के.वाय.सी,चेकचे प्रकार याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे समर्पक उत्तर देऊन निरसन केले.या बैंक भेटिप्रसंगी प्रा.डॉ.आर.एम.सरोदे आणि प्रा. डॉ. जयश्री सरोदे बँकेत उपस्थित होते.



