भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल नगरपरिषद कर्मचारी विनय पगारे यांचा मुलगा व नहाटा महाविद्यालयाचा विद्यार्थी सध्या पुणे येथिल अशोक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला परशुराम विनय पगारे या युवकाने पुणे महानगरपालिका आयोजित बाॅक्सिंग 2020 च्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले असुन सर्वोकृष्ठ बाॅक्सर पदाचाही मान मिळवीला आहे.
गुलटेकडी पुणे येथे आयोजित या स्पर्धेचे बक्षिस वितरण झाले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर मुरलीधर ओहळ हे होते तर सहाय्यक पोलिस आयुक्त श्री.बाबर यांच्या हस्ते परशुरामला सन्मानित करण्यात आले.पुण्यातील परशुरामचे हे सातवे गोल्ड मेडल असुन पुणे पोलिस आयुक्तालया तर्फे झालेल्या स्पर्धेतही तो सुवर्ण पदाचा मानकरी ठरला होता.बहिणाबाई विद्यापिठाचाही तो गोल्ड मेडलिस्ट आहे.विजय गुज्जर हे त्याचे प्रशिक्षक आहेत.परशुरामच्या या यशा बद्दल माजी आमदार संतोष चौधरी,माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी,अशोक चौधरी, नगरसेवक संतोष त्रंबक चौधरी,कैलास चौधरी यांच्यासह भानुदास पाटील,रंगलाल पवार,अनिल मनवाडे,काका शेखर पगारे वडील विनय पगारे व शिक्षकवृदाने अभिनंदन केले आहे.



