भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या संशयित आरोपीस भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील पटेल चहाच्या दुकानाजवळ संशयित आरोपी तुषार प्रल्हाद बऱ्हाटे (वय ३०) रा.कोलते गल्ली हा कल्याण मटका जुगाराचा खेळ चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी, पोहेकॉ.संजय भदाने, पोना.रमण सुरळकर, संदेश निकम,उमाकांत पाटील,महेश चौधरी,पोकॉ.विकास सातदिवे, तुषार पाटील,ईश्वर भालेराव, सुभाष साबळे,बापुराव बडगुजर यांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील ८२० रूपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना.संदेश निकम हे करीत आहे.



