रेल्‍वे कर्मचारी शिबीरासाठी शिमला- कुलू मनाली रवाना

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल्वे कर्मचारी शिबीरासाठी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी पठाणकोट एक्सप्रेसने सिमला-कुलू मनाली येथे रवाना झाला.
कर्मचाऱ्यांच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि शिबीरानंतर पुन्हा नवीन उत्साहाने कामावर रुजू व्हावे या उद्दशाने दर वर्षी या शिबीराचे आयोजन करण्यात येते.
यात ६६ कर्मचारी, शिबिर तथा राज भाषा अधिकारी एस.आर.वाढवे आणि व्यवस्थापन टीम सहभागी आहे. कर्मचारी कल्याण निधी समिती द्वारा या शिबीराचे आयोजन करण्यात येते. सकाळी कॅम्प साठी जातांना कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वरिष्‍ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. डी.गांगुर्डे, विभागीय कार्मिक अधिकारी एम के गायकवाड,सहाय्‍यक कार्मिक अधिकारी आर एच परदेशी,बी.एस.रामटेके तसेच एसबीएफ कमिटी सदस्य आर.सी. रावत, एस.एस.चौधरी, जी.एस.ढोले, सनोज कुमार आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *