बोदवड – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भाविक महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगर येथुन २२ रोजी मुक्ताईचे दर्शन करून परतीच्या वाटेवर असतांना तालुक्यातील शिरसाळा येथे भाविकांचे वाहन पलटी झाल्याने काही भाविक त्यात अडकलेले होते व काहींना गंभीर दुखापत झाली .यावेळी येथील रस्त्यावरून जात असतांना माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी तत्काळ आपले वाहन थांबवून त्वरित आपल्या वाहनातून अपघातातील जखमींना बोदवड येथे उपचारासाठी रवाना केले.
यावेळी वाहनाखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी भाजपचे अनिल खंडेलवाल,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष विनोद कोळी,दिपक वाणी,सचिन राजपूत,रवि खेवलकर,आनंदा पाटील,सुमेरसिंग पाटील यांनी सहकार्य केले.




