इंग्रजी व गणित विषयावर एक दिवसीय शैक्षणिक प्रदर्शन.

भुसावळ-(प्रतिनिधी )-
रावेर येथील फैजाने गुलशने रज़ा मदरसा मधील इंग्रजी आणि गणित या विषयावर आधारित एक दिवसीय शैक्षणिक प्रदर्शन दावत-ए-इस्लामीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यात मदरशाच्या विद्यार्थ्यांनी सद्‍ध्‍याच्या चार्टमध्ये वापरल्या जाणार्‍या शब्दांमधून वाक्ये तयार करणे,इमेज मॉडेल आणि शब्दांचे समूह आदी उत्कृष्टपणे सादर केले. मॉडेल आणि गणितातील विविध आकारांवर अवलंबून मूळ वस्तू, मॉडेल आणि इतर शैक्षणिक चार्ट, उपकरणे तयार करण्यात आले होते.
दावत-ए-इस्लामी हिंदने या वर्षापासून आपल्या सर्व मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणा सोबत आधुनिक शिक्षण सुरू केले आहे.या अंतर्गत इंग्रजी गणित आणि विज्ञान असे विषय मदरशांमध्ये शिकवले जात आहेत.
          सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद नाझर हे होते.नियंत्रक अब्दुल रहीम अतारी यांच्या देखरेखीखाली सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ वसीम,डॉ आदिल,रेहान सर,मोहसीन सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्थानिक पातळीवरील विविध डॉक्टर्स,अभियंते व शिक्षकांनीही सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
        कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहील मिसबाही,सालेह नूर साहिब,मकसूद भाई,अमजद सर,झिया भाई आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *