बेलव्हाळ येथे आमदार निधीतुन आरओ प्‍लॅन्‍टचे उद्‍घाटन.

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्‍यातील बेलव्हाळ येथे आ.संजय सावकारे यांच्या निधीतुन आरओ प्‍लॅन्‍टचे श्रीफळ फोडुन उद्‍घाटन गांवातील ज्येष्ठ नागरीक शंकर तुकाराम भंगाळे यांच्या हस्ते करून तसेच आरओ प्रणालीची फित कापुन आ.संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच बेलव्हाळ ग्रा.पं.तर्फे १४ व्‍या वित्त आयोगातुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सुध्‍दा आ.संजय सावकारे,भुसावळ पंचायत समिती सभापती मनिषा पाटील,सरपंचा मनिषा खाचणे,भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील,ग्रा.पं.सदस्‍य,महिला बचत गट व बहुसंख्य बेलव्हाळ गांवातील नागरिक उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *