मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-
महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी संत मुक्ताई नवीन मंदिरावर सकाळी 8.30 वाजता संत मुक्ताईचे दर्शन घेतले. भाविक भक्तांशी प्रसंगी त्यांनी संवाद साधला. यावेळी संस्थाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याकडून मुक्ताई मंदिरासंदर्भात माहिती देण्यात आली. प्रसंगी संस्थाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, ईश्वर रहाणे, मंदिराचे व्यवस्थापक रवींद्र हरणे, विनोद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय सापधरे, कल्याण पाटील, वारकरी कीर्तनकार आदी भक्त मंडळी उपस्थित होती.
राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून केले स्वागत
महाशिवरात्री निमित्त राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संत मुक्ताई चे दर्शन घेतले त्यातच काल रात्री अर्जंट बैठकीला मुंबई येथे जावे लागल्याने व मतदार संघात शेतकरी नेते तथा राज्यमंत्री बच्चू कडू आल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे भ्रमणध्वनी करून स्वागत केले .





