भुसावळात शिवजयंतीचा उत्साह शहर भगवेमय ; विविध भागामधुन रॅली सजीव व आकर्षक देखावे ; चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

भुसावळ (प्रतिनिधी )-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत, जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची३९० वी जयंती शहरात बुधवार १९ फेब्रूवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्त शहरातील तमाम शिवभक्त मावळ्यांसह शिवप्रेमी नागरिकांनी विविध भागां मधून ढोलताश्यांच्या गजरात गगनभेदी घोषणा देत परिसर दणांणुन सोडला .
शिव जयंती निमित्त शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासह प्रतिमेस माल्यार्पण पूजन करण्यात आले .यावेळी महाराजांना मुजरा करून अभिवादन करण्यात आले .
मराठा समाज उत्सव समीती
तर्फे शिवाजी नगर भागातुन शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली . भुसावळ येथील स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ़ पूर्णाकृति पुतळयास आमदार संजय सावकारे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले . प्रसंगी पिंटू कोठारी , राजेन्द्र आवटे, मुकेश गुंजाळ, लेकुरवाले, यांचेसह मराठा समाज बांधव व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते .
साकेगाव शिवजयंती उत्सव समिती तर्फे पथनाट्य सादर
साकेगाव येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालखी उत्सव व जनजागृतीपर आदर्श गाव संकल्पनेवर आधारित गावातील चौकाचौकात पथनाट्य सादर करीत महाराजांचे विचार व आचार घराघरात पोहोचविण्याचा संकल्प गावातील युवकांनी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या सादर केला व आदर्श शिवजयंती उत्सव साजरा केला
ताप्ती पब्लिक स्कूल
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्ये सहभागी झालेले ताप्ती पब्लिक स्कूल च्या विदयार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ असा सुंदर सजीव देखावा सादर केला.त्यात विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी लेझीम पथक मध्ये सहभाग नोंदवला तसेच वेशभूषा स्पर्धेत सहभाग घेतला आणि विजेते ठरले.
बियाणी स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मनोज बियाणी यांनी माल्यार्पण केले.तसेच शिवाजी महाराजांच्या कुशल राज्यकारभार विषयी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले.त्या नंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांचा जल्लोष दिसून येत होता आणि उत्साहात घोषणा देत मार्गक्रमण करत होते,तसेच लेझीम पथक लक्ष वेधून घेत होते आणि शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील प्रसंग व पोवाड्यातून हुबेहूब सजीव देखावा सादर केला,या वेळी मनोज बियाणी,संगीता बियाणी,राजू पारीख, प्रवीण भराडीया,गोपाळ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते .
संविधान बचाव समितीतर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन ;
येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर केंद्र सरकारच्या विरोधात 30 दिवसापासून संविधान बचाव समितितर्फे भुसावळात साखळी उपोषणचे धरणे आंदोलन सुरू आहे. शिवजयंती निमित्त संविधान बचाव समिती तर्फे दिनांक 19 फेब्रुवारीला श्री.शिवाजी महाराजांना अभिवादन करून उपोषणाला सुरवात करण्यात आली.
संविधान बचाव समिति तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा खरा जाणता राजा छत्रपति शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी साबिर शेख यांनी महाराजांचे चारित्र्य बाबत आपले विचार मांडले.संविधान बचाव समिती उपोषण स्थळी शिवजयंती निमित्त अँड. श्याम गोंदेकर यांनी मार्गदर्शन केले .नंतर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सलीम चूड़ीवाले,सलीम पिंजारी, नगरसेवक अशरफ कुरेशी,यूनिस मामा ,मोहम्मद आबिद, दानिश पटेल,अजहर मजहर ,फरहान इलेक्ट्रिक,वासिफ सय्यद, इमरान खान, नसीम तड़वी,जुनेद खान ,अकील खान, हाफिज रईस अब्बास अली ,बहरी गफ्फार देशमुख, सलीम भाई ,साबिर शेख यांनी कुरान पठन केले तर हाफिज रईस यांनी दुआ करून सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *